विराटच्या शंभरीच्या निमित्ताने

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ४ मार्च ला मोहालीमध्ये आपली १०० वी कसोटी खेळणार आहे. शंभर कसोटी खेळणारा विराट १२ वा भारतीय खेळाडू असेल.

१०० कसोटी खेळलेले भारतीय खेळाडू
सचिन – २००
द्रविड – १६३
लक्ष्मण – १३४
कुंबळे – १३२
कपिल – १३१
गावसकर – १२५
वेंगसरकर – ११६
गांगुली – ११३
इशांत – १०५
भज्जी – १०३
सेहवाग – १०३

९० किंवा त्याहून अधिक कसोटी खेळलेले भारतीय खेळाडू
अझर – ९९
पुजारा – ९५
झहीर – ९२
गुंडाप्पा विश्वनाथ – ९१
धोनी – ९०

या कसोटीत कोहलीने शतक केले तर आपल्या १०० व्या कसोटीत शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू असेल.

आपल्या शंभराव्या कसोटीत शतक करणारे फलंदाज

सर कॉलिन कॉड्रे
जावेद मियाँदाद
गॉर्डन ग्रिनीज
ऍलेक स्टुअर्ट
इंझमाम ऊल हक
रिकी पॉंटिंग
ग्रॅमी स्मिथ
हाशिम आमला
जो रूट

आपल्या शंभराव्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक करणारा रिकी पॉंटिंग हा एकमेव फलंदाज आहे. त्याने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.

कसोटीमध्ये ८००० धावा पूर्ण करण्यासाठी कोहलीला ३८ धावांची गरज आहे. असे केले तर कसोटीत ८००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा कोहली सहावा भारतीय खेळाडू असेल. याआधी सचिन, द्रविड,गावसकर, लक्ष्मण आणि सेहवाग यांनी अशी कामगिरी केली आहे.

या कसोटीत कोहलीने ८००० धावांचा टप्पा गाठला तर तो सगळ्यात कमी कसोटीत ही कामगिरी करणारा भारतीय फलंदाज ठरेल. इतर संघाचा विचार केला तर कोहलीच्या पुढे ८००० हुन अधिक धावा केलेले फलंदाज ढिगाने आहेत.

कसोटीत सर्वाधिक शतके काढणारे भारतीय फलंदाज
सचिन – ५१
द्रविड – ३६
गावसकर – ३४
कोहली – २७

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.