आयपीएल लिलाव २०२२ – पगाराचे आकडे काय सांगतात?

एकूण उपलब्ध रक्कम – ९०० कोटी

खर्च झालेली रक्कम – ८७५.९० कोटी

प्रत्येक खेळाडूची सरासरी सॅलरी – ३.७० कोटी

एकूण सहभागी खेळाडू – २३७ (२०४ लिलालवातून खरेदी झालेले, ३३ संघांनी कायम केलेले)

२०१८ मध्ये आठ संघ होते आणि त्यांनी मिळून ६०४.३० कोटी रुपये खर्च करत १८७ खेळाडू खरेदी केले होते.

आयपीएल २०२२ मध्ये १० कोटी किंवा त्याहून अधिक पैसे कमावणारे खेळाडू – २६
२०१८ मध्ये हा आकडा १२ होता.

२०१८ आणि २०२२ या दोन्ही वेळेस १० कोटी पेक्षा जास्त कमाई करणारे खेळाडू
हार्दिक पंड्या
रोहित शर्मा
के एल राहुल
धोनी
विराट कोहली

१५ कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे खेळाडू  – ८
त्यांची एकूण सॅलरी – १२५.२५ कोटी

१०-१५ कोटी कमाई करणारे खेळाडू – १८
त्यांची एकूण सॅलरी – २०७.७५ कोटी

५-१० कोटी कमाई करणारे खेळाडू – ४७
त्यांची एकूण सॅलरी – ३४४.९५ कोटी

२-५ कोटी कमाई करणारे खेळाडू – ४३
त्यांची एकूण सॅलरी – १२९.२० कोटी

२ कोटींपेक्षा कमी कमाई करणारे खेळाडू – १२१
त्यांची एकूण सॅलरी – ६९.७४ कोटी

सर्वाधिक परदेशी खेळाडू
वेस्ट इंडिज -१७
ऑस्ट्रेलिया – १४
इंग्लंड – १३
न्यूझीलंड – १२
दक्षिण आफ्रिका – ११
श्रीलंका – ५
अफगाणिस्तान – ४
बांगलादेश – १

२०१८ मध्ये परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक १९ खेळाडू होते. त्यांची सरासरी सॅलरी सर्वाधिक ५.०९ कोटी होती.
यावर्षी इंग्लंडच्या खेळाडूंची सरासरी सॅलरी सर्वाधिक ४.९८ कोटी एवढी आहे.

 

२०१८ मध्ये भारतीय खेळाडूंची सरासरी सॅलरी – ३.७० कोटी
२०२२ मध्ये भारतीय खेळाडूंची सरासरी सॅलरी – ३.३८ कोटी

 

१० कोटींहून जास्त कमाई असणारे सर्वाधिक खेळाडू 
बंगलोर – ४
चेन्नई – ३
मुंबई – ३
यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद हा एकमेव संघ असा आहे की ज्यात एकाही भारतीय खेळाडूची सॅलरी १० कोटींपेक्षा जास्त नाही.

 

अनकॅप्ड भारतीय खेळाडू 
२०१८ – ७२
२०२२ – ९८ (यावेळी २ संघ जास्त आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच एकूण खेळाडूंची संख्या १८७ वरून २३७ वर गेली.)

 

अनकॅप्ड भारतीय खेळाडूंची संख्या वाढली तरी त्यांची सॅलरी मात्र २०१८ च्या तुलनेत फक्त ३.९१% वाढली आहे. २०१८ मध्ये या खेळाडूंची सरासरी सॅलरी १.२७ कोटी होती जी वाढून आता १.३२ कोटी झाली आहे. मात्र संघानी आपल्या खेळाडूंना देत असेल्या सॅलरीमध्ये २०१८ च्या तुलनेत १२.५% ची वाढ केली आहे

याच काळात कॅप्ड भारतीय खेळाडूंची सॅलरी मात्र २५% ने वाढली आहे. २०१८ मध्ये कॅप्ड भारतीय खेळाडूंची सॅलरी ५.३१ कोटी होती जी आता वाढून ६.६४ कोटी झाली आहे.

 

सॅलरीमध्ये झालेल्या वाढीचा सर्वाधिक फायदा ऑल राऊंडर खेळाडूंना झाल्याचे दिसते. २०१८ मध्ये या खेळाडूंची सरासरी सॅलरी २.८१ कोटी रुपये होती जी आता वाढून ३.६३ कोटी झाली आहे. म्हणजे जवळपास ३०% वाढ झाली आहे. या हंगामात ७.५ कोटी किंवा त्याहून अधिक सॅलरी असलेले एकूण २१ ऑल राऊंडर्स आहेत.

 

विकेट किपर्स यावर्षी सर्वाधिक कमाई करतील. २०१८ मध्ये विकेट किपर्सची सरासरी सॅलरी ४.१८ कोटी होती जी आता यावर्षी ५.०९ कोटी असेल. २०१८ मध्ये एकूण १७ विकेट किपर्स होते जी संख्या आता वाढून २७ वर गेली आहे.

यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १८ स्पिनर्स असतील. यापैकी एकट्या रशीद खानची कमाई १ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. त्याच्या खालोखाल चहल ६.५० कोटींवर आहे.

आयपीएल संघानी खेळाडू निवडताना आणि त्यांना पैसे देताना टी-२० शी निगडित स्किल्सचाही बारकाईने विचार केला आहे. डेथ ओव्हर्समध्ये बॉलिंग करू शकतील असे खेळाडू म्हणजे १७-२० ओव्हर्समध्ये गेल्या तीन वर्षांत कमीत कमी १५० चेंडू टाकलेले खेळाडू जे आहेत त्यांची सरासरी सॅलरी ६ कोटी रुपये आहे.

 

याबरोबरच जर खेळाडूंचा टी-२० मधील स्ट्राईक रेट चांगला असेल तर त्यांना जास्त कमाई झाली आहे.
९९ खेळाडू असे आहेत की ज्यांनी २० पेक्षा जास्त सरासरीने ५०० हुन अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये ज्यांचा स्ट्राईक रेट १३० पेक्षा जास्त आहे त्यांची सरासरी सॅलरी ५. ९१ कोटी आहे तर १३० पेक्षा कमी स्ट्राईक रेट असलेल्यांची सॅलरी ३.८४ कोटी आहे.

 

आयपीएल २०२२ मधील सर्वाधिक वयस्कर संघ 
चेन्नई – २८.६४ वर्षे
लखनौ, टायटन्स, बंगलोर आणि राजस्थान संघांची वयेदेखील २७-२८ दरम्यान आहेत.
मुंबई आणि हैद्राबाद संघांची सरासरी वये २६ पेक्षा कमी आहेत.

 

आयपीएलमध्ये खेळताना जसे तुमचे वय वाढते तशी तुमची सॅलरीसुद्धा वाढते. 

२० हून कमी वय असेलेले खेळाडू – ११
सरासरी सॅलरी – ०.९४ कोटी

सर्वाधिक सॅलरी – डिवॉल्ड ब्रुईस – ३ कोटी

२०-२५ दरम्यान वय असलेले खेळाडू – ६०
सरासरी सॅलरी – २.८७ कोटी
सर्वाधिक सॅलरी – रिषभ पंत – १६ कोटी
२५-३० दरम्यान वय असलेले खेळाडू – ८६
सरासरी सॅलरी – ३.६५ कोटी
सर्वाधिक सॅलरी – के एल राहुल – १७ कोटी
३०-३५ दरम्यान वय असलेले खेळाडू – ६८
सरासरी सॅलरी – ४.६९ कोटी
सर्वाधिक सॅलरी – रोहित शर्मा, रवींद्र जडेजा – १६ कोटी
३५ पेक्षा जास्त वय असलेले खेळाडू – १२
सरासरी सॅलरी – ५.०५ कोटी
सर्वाधिक सॅलरी – धोनी – १२ कोटी

 

तुम्ही जितक्या जास्त आयपीएल मॅचेस खेळाल तेवढी तुमची कमाई जास्त होते. 
१५० हून अधिक आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – १४
सरासरी सॅलरी – ७.७७ कोटी
सर्वाधिक सॅलरी – रोहित शर्मा, रवींद्र जडेजा – १६ कोटी

 

१००-१५० दरम्यान आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – १२
सरासरी सॅलरी – ६.९८ कोटी
सर्वाधिक सॅलरी – संजू सॅमसन – १४ कोटी
५०-१०० दरम्यान आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – ३४
सरासरी सॅलरी – ८.०६ कोटी
सर्वाधिक सॅलरी – के एल राहुल – १७ कोटी
१५-५० दरम्यान आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – ५०
सरासरी सॅलरी – ४.३४ कोटी
सर्वाधिक सॅलरी – निकोलस पुरन – १०.७५ कोटी
१-१५ दरम्यान आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – ५५
सरासरी सॅलरी – २.४४ कोटी
सर्वाधिक सॅलरी – लियम लिव्हिंगस्टन – ११.५ कोटी
० आयपीएल मॅचेस खेळलेले खेळाडू – ७२
सरासरी सॅलरी – ०.८१ कोटी
सर्वाधिक सॅलरी – रोमारिओ शेफर्ड – ७.७५ कोटी

 

आकडेवारी – इएसपीएन क्रिकइन्फो

लिलावानंतर काही खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. ही आकडेवारी खेळाडूंनी माघार घेण्याआधीची आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.