About Me

 

आदित्य गोपाळ गुंड
आदित्य गोपाळ गुंड

आदित्य गोपाळ गुंड

अस्सल जुंदरी मातीत घोळलेलं आणि सातासमुद्रापार पोचलेलं एक अष्टपैलू व्यक्तीमत्व. मुळचा अभियांत्रिकी पदवीधर असलेला हा माणूस त्या क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीतील आपल्या उच्चपदस्थ कामाची जबाबदारी पार पाडता पाडता विविध क्षेत्रात लिलया मुक्तपणे संचारतो. त्याचं हे संचारणं फक्त त्याच्यापुरतं मर्यादीत नसून त्याच्या बहुआयामी व्यक्त होण्यातून, विविध माध्यमातून त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला तो त्या वैश्विक अनुभूतीचा निखळ आनंद देत असतो. हे त्याचं एक आगळंवेगळं बहुमोल वैशिष्ट्य.

पुण्यात शिक्षण घेत असताना पुरुषोत्तम करंडक वगैरेमध्ये सहभाग होताच. पुढे अमेरिकेत उच्चशिक्षण, त्यानंतर तिथेच नोकरी, पुन्हा भारतात परतून त्याच कंपनीचा आशियाचा प्रतिनिधी असा आदित्यचा आजवरचा व्यावसायिक जीवनातील प्रवास. कामानिमित्त विविध देशांत भ्रमंती करत असताना तेथील अनुभवांची प्रचिती इतरांनाही देण्याचा प्रयत्न आदित्य करत असतो. मग त्यात निरनिराळ्या देशात, शहरात मॅरथॉन धावणं असेल, विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटीगाठी व त्यांचे किस्से असतील, अभियांत्रिकी कामाच्या माध्यमातून विविध शहरांच्या विकासाला नवी दिशा देणं असेल, विमानामधून काढलेल्या अफलातून छायाचित्रांनी पुण्यापासून चिन-अमेरिकेपर्यंत देशविदेशातील छायाचित्र प्रदर्शने गाजवणे असेल, त्याच्या मुशाफीरीची ही यादी न संपणारी आहे.

गेल्या दशकभराच्या विविधांगी दिर्घानुभवाच्या बळावर एक ब्लॉगर, स्तंभलेखक म्हणून आदित्यने स्वतःची एक वेगळी शैली विकसीत केली आहे. महास्पोर्ट्स या क्रिडाविषयक संकेतस्थळावर नियमितपणे प्रसिद्ध होणारी त्याची क्रिकेट व क्रिकेटपट्टूंच्या अप्रकाशित, अप्रसिद्ध पैलूंवर अनोखा प्रकाश टाकणारी ‘भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार’ ही लेखमाला प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. लवकरच ती पुस्तकरुपातही वाचकांच्या भेटीस येत आहे. याशिवाय विविध संकेतस्थळे, फेसबुक, ट्विटर वगैरे सोशल माध्यमांतूनही आदित्यची मुशाफिरी सुरु असते. हे सर्व लेखन एकाच ठिकाणी सुलभतेने उपलब्ध असावे, ही मित्रमंडळी व वाचकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्णत्वास नेत आहोत. हा प्रयत्न आपणा सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते.

अल्पपरिचय…
जन्म – नारायणगाव, पुणे
मुळ गाव – थोरांदळे, ता. आंबेगाव, जि. पुणे
सध्या – पिंपळे सौदागर, पुणे
शिक्षण – प्राथमिक व माध्यमिक (जुन्नर), यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी (एमआयटी, पुणे), औद्योगिक अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी (कॅन्सस स्टेट युनिव्हर्सिटी, मॅनहॅटन,अमेरिका)
आवड – लेखन, वाचन, चित्रपट, संगीत, क्रिडा, फोटोग्राफी
ई-मेल – [email protected]

व्याख्याने
१. डॉ.के.एस.खराडे फाऊंडेशन, पारगाव येथे ‘परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
२. गुरू गोविंदसिंग कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, नाशिक येथे ‘अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन
३.महास्पोर्ट्स या वेबसाईटच्या कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान
४.बारावी, पदवी नंतरच्या करिअर संधींबाबत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

परिषदा
१. गुगलतर्फे आयोजित ‘गुगल सर्च संमेलन’ या परिषदेत मराठीतील कंटेंट जनरेटर म्हणून सहभाग
२. बीबीसीतर्फे आयोजित ‘बियाँड फेक न्यूज’ या परिषदेत सहभाग

पुरस्कार
१.महाराष्ट्र साहित्य परिषदेने ‘सर्वोत्कृष्ट ऑनलाइन दिवाळी अंक’ म्हणून गौरविलेल्या ‘बिगुल दिवाळी अंकात’ लेख प्रदर्शित
२.क्लिक फोटोग्राफी प्रदर्शन २०१६,२०१८ मध्ये फोटो प्रदर्शित
३. चायना नॅशनल टुरिस्ट ऑफिस,नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम पुरस्कार
आजवर लेखन केलेल्या वेबसाईट्स, वर्तमानपत्रे –
१.महास्पोर्ट्स – टेनिस, क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आणि इतर अनेक खेळांबद्दल अभ्यासपूर्ण लेखन
२.सविस्तर – प्रवासात भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांची राजकीय मते, कौटुंबिक समस्या इत्यादी विषयांचे रोचक अनुभवकथन
३.बोलभिडू – विविध विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन
४.सकाळ – छांदिष्ट अमेरिकन्स – अमेरिका आणि अमेरिकन संस्कृती याचे वर्णन
५. बिगुल
६. खेलकुद – क्रीडाविषयक मराठी मासिक

————————————————————————————————————————————-

Aditya Gopal Gund
Aditya Gopal Gund

Aditya Gopal Gund

Hailing from the town of Junnar made famous as the birthplace of Shivaji Maharaj, the founder of the Maratha Empire in India, Aditya Gopal Gund is a multi-faceted personality who has successfully shouldered not only his professional responsibilities that of a high ranking official in a multinational company but through his passion for photography, keen observation and lucid language skills made sure that people coming in contact with him leave with a feeling that the world is their oyster!

After completing his graduation in Mechanical Engineering from Pune, Aditya moved to the United States of America to pursue his post-graduation. Being appointed as a representative for Asia by his company Aditya moved to India. His work involves a lot of international travel. International travel and the experiences derived from this has been the basis for his travelogues, photographs and articles published in many online journals. His photographs have been exhibited in exhibitions ranging from Pune to China, USA etc. In the course of his professional work, he has been a proud contributor in several developmental projects in various cities in India and aboard.

In the past decade, Aditya has mixed work with pleasure and never let the monotony of work-travel get to him. The result has been that now Aditya has created a space for himself in the blogging work. Maha Sports – a sports related website hosts a series of articles written by him which talk about ‘would-be’ cricketers and has garnered a lot of publicity due to its novel subject matter. In the coming days, this series will be published as a book.

For quite some time now his friends, followers and fans wanted his photography, literature to be easily accessible and consolidated at one place. This website is an effort in that direction. We hope that this endeavor would also get your love and support.

Birth – Narayangaon, Pune
Native Place – Thorandale Taluka – Ambegaon Disctrict – Pune
Current – Pimple Saudagar, Pune
Education –
Secondary & Higher Secondary – Junnar
BE Mechanical – MIT Pune
MS Industrial Engineering – Kansas State University, USA
Hobbies – Reading, Writing, Movies, Music, Sports, Photography
email – [email protected]

Lectures
1. Dr. K.S.Kharade Foundation, Pargaon, Junnar – Higher Education Opportunities outside India – Conducted a lecture for 11th and 12th grade students
2. Guru Govind Singh College of Engineering, Nashik – Importance of Internship for Engineering Students – Conducted a lecture for FE and SE Students
3. Conducted a lecture for employees of www.MahaSports.co.in
4. Guided many students on career opportunities after 12th grade and graduation

Conferences
1. Participated in Google Search Conference as a Marathi Language Content Creator
2. Participated in a conference, ‘Beyond Fake News’ conducted by BBC News

Awards
1. Published an article in Bigul Online Diwali Ank. This Diwali Ank was honored by Maharashtra Sahitya Parishad as a Best Online Diwali Ank
2. Displayed photographs in Click Photography Exhibition 2016,2018
3. Won first prize in a photography competition organized by China National Tourist Office, New Delhi
Articles featured on following websites
1. Maha Sports – Tennis, Cricket, Kabaddi, Basketball and other sports related articles
2. Savistar – Travel experience in and around the world
3. Bol Bhidu – Wrote on various topics including Need of content generation in Marathi Language, Ola Uber Business Models etc.
4. Sakal – Article about Midwestern Culture
5. Bigul
6. Khelkud – Marathi Magazine dedicated to sports