फॉर्म्युला वन २०२२ हंगामाबाबत सारे काही

२०२२ चा फॉर्म्युला वन हंगाम १८ मार्चला सुरु होईल.हंगामाची सुरुवात २० मार्चला बहारीन जीपीने होऊन होऊन सांगता २० नोव्हेंबरला अबुधाबी जीपीने होईल. हा फॉर्म्युला वनचा आजवरचा सर्वात मोठा हंगाम असेल.यावर्षीच्या फॉर्म्युला वन हंगामात एकूण २३ रेसेस असतील.

 

या हंगामात मायामी जीपी रेस नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. मे महिन्याच्या ६ ते ८ तारखांदरम्यान ही रेस पार पडेल. यामुळे २०२२ च्या हंगामात अमेरिकेत एकूण दोन रेस होतील. एक रेस टेक्सस राज्यातील ऑस्टिन येथे पार पडेल. एकाच हंगामातील दोन रेसेस अमेरिकेत होण्याचा योग याआधी १९८४ साली आला होता

 

यावर्षीच्या हंगामासाठी फॉर्म्युला वन कार्समध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामध्ये १३ इंचाऐवजी १८ इंचाचे टायर्स, फ्रंट विंग आणि नोझचे पूर्णपणे नवीन डिझाईन, गाड्यांच्या इंधनात १०% इथेनॉल असे मुख्य बदल असतील. या बदलांमुळे गाडयांना एकमेकांच्या जवळ राहून रेस करणे सोपे जाईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे हा हंगाम चुरशीचा होईल.

 

एक प्रमुख बदल गाड्यांच्या लोअर बॉडीमध्ये केला गेला आहे. जेव्हा दोन कार्स एकमेकांशी रेस करत असतात तेव्हा पुढच्या कारमधून बाहेर पडणाऱ्या दूषित हवेमुळे मागील कारला कॉर्नर घेताना तेवढाच वेग ठेवणे अवघड जाते. कॉर्नरला कारचा डाऊनफोर्स जवळपास ५०% पर्यंत कमी होतो. आणि समोरून येणाऱ्या दूषित हवेमुळे कार अन्स्टेबल होते. नव्याने डिझाईन केलेले फ्रंट विंग आणि नोझ या समस्येवर उपाय असतील असा विश्वास कार डिझायनर्सला आहे. याशिवाय रेअर विंगला टिप्स देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढून येणारी हवा सरळ मागे न जाता वरच्या बाजूला ढकलली जाईल. यामुळे मागील कारला पुढील कारच्या अधिकाधिक जवळ राहून रेस करणे शक्य होईल. हा फायदा किती आहे? तर सध्याच्या कार्समध्ये २० मीटर अंतरामध्ये ३५% तर १० मीटर अंतरामध्ये ४६% डाऊन फोर्स कमी झाल्याचे दिसते. हेच प्रमाण २०२२ छ्या नव्या कार्समध्ये २० मीटरसाठी ४% तर १० मीटर अंतरासाठी १८% एवढे कमी झालेले आहे. 

 

ड्रायव्हर्सची सुरक्षितता हा फॉर्म्युला वनसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. यावर्षीच्या कार्समध्ये म्हणूनच सेफ्टीकडे आणखी जास्त लक्ष देण्यात आले आहे. जर कारचा क्रॅश झाला तर इंजिन हे चासीसपासून पूर्ण वेगळे होईल अशा प्रकारे कार्सचे डिझाईन करणे संघाना बंधनकारक आहे. 

 

याआधीही फॉर्म्युला वन कार्स ५.७५% बायो फ्युएल वापरू शकत होत्या. यावर्षीपासून या कार्समध्ये E10 हे नवे फ्युएल वापरणे बंधनकारक असेल. यामध्ये E म्हणजे इथेनॉल आणि १० म्हणजे इथेनॉलचे प्रमाण जे १०% असेल. 

 

यावर्षीच्या हंगामात एकूण चार विश्वविजेते असतील. 
लुईस हॅमिल्टन – ७
सिबॅस्टियन व्हेटल – ४
फर्नांडो अलोन्झो – २
मॅक्स व्हर्स्टास्पेन – १

 

यंदाच्या फॉर्म्युला वन हंगामात सहभागी होणारे संघ आणि त्यांचे ड्रायव्हर्स
मर्सिडीझ – लुईस हॅमिल्टन, जॉर्ज रसेल
रेड बुल – मॅक्स व्हर्स्टास्पेन, सर्जिओ पेरेझ
फेरारी – चार्ल्स लक्लेर, कार्लोस सेन्झ
मॅक्लारेन – लँडो नॉरीस, डॅनियल रिकार्डो
अल्पाईन – फर्नाडो अलोन्झो, एस्तेबान ओकॉन
अल्फाटॉरी – पिअर गॅस्ली, युकी सुनोडा
ऍस्टन मार्टिन –  सिबॅस्टियन व्हेटल, लान्स स्ट्रॉल
विल्यम्स – निकोलस लतिफी, ऍलेक्स ऍल्बॉन
अल्फा रोमिओ – व्हाल्टेरी बोटास, ग्वान्यू जो
हास – मिक शुमाकर, निकिता मेझपिन

 

गेल्यावर्षीचा विजेता मॅक्स व्हर्स्टास्पेन हा आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल तर सात वेळचा विजेता ब्रिटनचा लुईस हॅमिल्टन आपले विक्रमी आठवे विजेतेपद मिळवण्यासाठी मॅक्सला टक्कर देईल. हॅमिल्टनच्या नावावर याआधी फॉर्म्युला वनमधील सर्वाधिक पोल पोझिशन, सर्वाधिक रेसमध्ये विजय असे विक्रम आहेत. सर्वाधिक विजेतेपदाच्या बाबतीत तो आणि मायकेल शूमाकर ७ विजेतेपदांसह बरोबरीत आहेत.

 

ग्वान्यू जो हा चीनचा ड्रायव्हर यंदाच्या फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण करेल. फॉर्म्युला वनमध्ये एखाद्या संघाकडून पूर्ण वेळ ड्रायव्हर असणारा तो पहिला चिनी नागरिक असेल. तो अल्फा रोमिओ संघाकडून व्हाल्टेरी बोटाससोबत यंदाच्या सिझनमध्ये सहभागी होईल. याआधी त्याने अल्पाईन आणि अल्फा रोमिओ या संघांसाठी टेस्ट ड्राईव्ह केले होते. ज्यो वयाच्या पाचव्या वर्षी चायनीज जीपी पहायला गेला होता. ती फॉर्म्युला वनमधील सर्वात पहिली चायनीज जीपी होती. त्या रेसमध्ये ज्यो त्याचा त्यावेळचा हिरो फर्नांडो अलोन्झोचा समर्थक होता. १७ वर्षानंतर ज्यो फॉर्म्युला वनमध्ये पदार्पण करेल तर फर्नांडो आजही इथे टिकून आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.