फॉर्म्युला वनचे चाहते नसाल तर आजची रेस पहाच..

फॉर्म्युला वनच्या वेळापत्रकातील सर्वाधिक थरारक,चित्तवेधक रेस म्हणून मोनॅको जीपीचा उल्लेख करता येईल..ही रेस जगातील काही महत्वाच्या रेसमधील एक म्हणून गणली जाते..या रेसचे वैशिष्ट्य असे की ह्या रेसचा ट्रॅक हा मोनॅको शहरातील रस्त्यांवरून जातो. यात अनेक नागमोडी वळणे, चढउतार असल्याने ड्रायव्हर्सना फॉर्म्युला वनच्या इतर रेसएवढा वेग ह्या रेसमध्ये घेता येत नाही.ह्या रेसट्रॅकवर एक छोटासा बोगदाही आहे.अनेकदा ह्या बोगद्यातही ड्रायव्हर्स एकमेकांना मागे टाकतात. अतिशय अवघड वळणे असणारा ट्रॅक असल्याने अनेकदा ड्रायव्हर्सचे वेगावर नियंत्रण न राहता ते साईड बॅरियर्सवर जाऊन आदळतात. सेफ्टी कार ट्रॅकवर आल्याविना मोनॅको जीपी फार कमी वेळा पूर्ण होते.फॉर्म्युला वन ड्रायव्हर्सचे कसब पूर्णपणे पणाला लावणारा हा ट्रॅक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. फॉर्म्युला वनच्या नियमानुसार प्रत्येक रेसचे अंतर ३०५ किमी असले पाहिजे.मात्र कमी वेग असल्याने मोनॅको जीपी मात्र ह्या नियमाला अपवाद आहे.
१९२९ पासून आजवर झालेल्या शर्यतीत ग्रॅहम हील ह्याने ही रेस पाच वेळा जिंकली आहे..असा पराक्रम करणारा तो पहिला ड्रायव्हर होता म्हणून त्याला ‘मिस्टर मोनॅको’ किंवा ‘किंग ऑफ मोनॅको’ असे म्हटले जाते.त्यानंतर ऐंशीच्या दशकाचा उत्तरार्ध आणि नव्वदच्या दशकाचा पूर्वार्ध ब्राझीलच्या आयर्टन सेनाने गाजवला.त्याने ही रेस सहा वेळा जिंकत हिलचा विक्रम मोडीत काढला. त्याने १९८९ ते १९९३ अशी सलग पाच वेळा ही शर्यत जिंकण्याचा विक्रम केला.सेनानंतर आजच्या पिढीत अनेकांना माहीत असलेला आणि अनेकांच्या आवडत्या मायकेल शुमाकरने ही रेस पाच वेळा जिंकत आपला ठसा उमटवला.सध्याच्या सीझनमध्ये असणाऱ्या ड्रायव्हरपैकी ब्रिटनचा लुईस हॅमिल्टन आणि जर्मनीचा सेबॅस्टीयन व्हेटल यांनी प्रत्येकी दोन वेळा मोनॅको जीपी जिंकलेली आहे.
तुम्ही जर फॉर्म्युला वनचे चाहते नसाल तर आज होणारी मोनॅको जीपी पहाच!! मला नंतर धन्यवाद दिलेत तरी चालेल..
आज संध्याकाळी ६:४० ला स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट२ एचडी वाहिनीवर ही रेस थेट प्रक्षेपित केली जाईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.