गणेशोत्सव

बरेच दिवस खरे तर गणेशोत्सवाबद्दल लिहावं असा विचारकरत होतो. आज अखेरीसमुहूर्त लागला. गणपती येणारम्हटलं की आपल्या आजूबाजूच्या वातावरणात एक वेगळंचचैतन्य आल्याची जाणीव व्हायला सुरुवात होते. ह्या ब्लॉगच्या निमित्ताने जुन्नरच्या गणेशोत्सवाच्या काही आठवणी जागविण्याचा प्रयत्न करतोय.
आमच्याकडे घरी गणपती नसे. पण माझ्याआत्त्याच्या घरी गणपती बसवायला आम्ही तिन्ही भावंडेजात असू. अगदी मूर्तीठरवायला जाण्यापासून ते घरी सजावटकरणे इथपर्यंत मी रवी दादालामदत करत असे. थोडा कळत्या वयाचाझाल्यावर गणपतीघरी आणल्यानंतर प्रतिष्ठापना करताना त्या वेळच पौरोहित्य देखील मीच करत असे. या सगळ्यात का कोण जाणे एक वेगळीचमजा वाटे.आत्याच्या घरच्यागणपतीबरोबर पेठेतल्या आम्हा सगळ्या लहान मुलांच्या मंडळाचा देखील गणपती असे. त्यासाठी मग वर्गणी गोळा करायला रोज संध्याकाळी आम्हीसगळे जात असू. यावर्षी काय काय करायचं, कोणत्या स्पर्धा भरवायच्या, मूर्ती कशी आणायची, अध्यक्ष कोण, खजिनदार कोण या सगळ्याप्रश्नांवर त्यावेळेस भरपूर खलबते केली जात. गणपतीआल्यानंतर ठरलेलेसगळे कार्यक्रम पार पाडण्यासाठी सगळेजणतितकेच कष्ट करत

 

शाळेतही गणपतीअसे. मग पहिल्या दिवशीप्रतिष्ठापना झाल्यानंतर कुलकर्णी सरांनी पाठ करून घेतलेलं अथर्वशीर्ष सगळे विद्यार्थी म्हणत असत. त्यावेळेस पाठ झालेलं अथर्वशीर्ष आजही रोज आंघोळकरताना अगदी तसच्या तसं म्हणताना फार बरं वाटत. गणपती म्हटलाकी शाळेतलेझीम असे. मुलींकरता टिपऱ्या असतं. गणपती सुरु होण्याच्या साधारणमहिनाभर आधी लेझीम पथकाचासराव सुरु होत असे. रोज शाळा सुटल्यावर हा सराव ढमालेसर करून घेत. विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस सबंध जुन्नर शहरातून आम्ही लेझीम खेळत जात असू. त्यावेळेस रस्त्याच्या आजुबाजूला उभे असलेल्या लोकांच्या, पालकांच्या कौतुकाने भरलेल्या नजरा आठवल्या की आजदेखील मोठा आनंद होतो. ढमाले सरांचाविसर्जन मिरवणुकीचा जोश काही न्याराच असे. खत्री पेढेवाल्याच्या दुकानासमोर शेवटची सलामीद्यायला आम्हीतिथे पोहोचलो की सर ढोल स्वतःच्या हातातघेत. एकदा त्यांनी ढोल हातात घेतलाकी तो ढोल फुटेपर्यंत ती सलामी चालत असे. सरांचातो त्वेषपाहून आम्हीसगळे भान हरपून लेझीमखेळत असू.आणि मग वेध लागत ते विसर्जन केल्यानंतर मिळणाऱ्या डाळीच्या खिरापतीचे. सगळ्या विद्यार्थ्यांना पुरेल एवढी खिरापततयार केली जात असे आणि अगदी डबे भरून ती दिली जात असे

 

इतकी सगळी मजा झाल्यानंतरदेखील दहाव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीचे वेध लागलेले असतं. त्या दिवशीभरपूर वेळ बाहेर राहायला मिळावं म्हणून मी आधीचे दिवस मी शक्य तेवढा जास्तवेळ अभ्यासाला देत असे. आणि मग अखेरीसदहावा दिवस आला की अगदी सकाळीचकल्याण पेठेच्या चौकात आम्ही जात असू. आत्ताअलीकडे लोकप्रिय झालेल्या स्पिकरच्या भिंतीत्यावेळेस नसत. त्या वेळेसअसत ते रांगडे ताफे. जुन्नरच्या आसपासच्या छोट्या गावागावानी असे ताफे असत. त्यांना विसर्जन मिरवणुकीच्या सुपाऱ्या दिल्याजात असत. तंबाखूचा किंवा गुटख्याचा एक तोबरा तोंडातभरून ह्या गावरान मंडळीनी एकदा ढोल ताशे बडवायला सुरुवात केली की ते तासनतास थांबतनसत. आज पुण्यातली १०१२ ताशे आणि ३०४० ढोल असणारी पथके जितका आवाज करतात तेवढाचकिवा त्याहून तसुभर जास्तच आवाज हे लोक ताशे आणि १५२० ढोलांच्या मदतीनेकरत असतआणि त्या तालावर आम्हीसारे बेभानहोऊन मोरयामोरया असा गजर करत नाचत असू. नकळत्या वयातलेनाचातानाचे अंगविक्षेप मान्य करताना आजदेखील लाज अशी वाटत नाही. दिवस पुढे सरेल तशी मिरवणूक पुढे सरकत असे. रविवार पेठेतून शनिमंदिराच्या चौकात मिरवणूक पोहोचली की आमचा मित्र विनायकच्या आईने केलेल्या बटाटेवड्यांवर ताव मारायला आम्हीजात असू. विनायकचे १०१२ आणि त्याचा भाऊ गणेशचे १०१२ असे जवळजवळ २०२२ जण या साऱ्यांना विन्याची आई आग्रहकरकरून वडे खाऊ घालत असे. हे सगळं संपत असताना गणपतीमशिदीजवळ कधी जातोय याची सगळे वाट पाहत असत. मानाचा पहिलारविवार पेठेचागणपती मशिदीजवळ गेला की जवजवळसगळ्याच पेठांची मुले तिथे जमा होत असत. ताफ्यावाल्याना त्या अगोदर विशेषखुराक पुरवलाजात असे.कडक पोलीसबंदोबस्तात मशिदीजवळ ताशांचा गजर सुरु झाला की नकळतपणे साऱ्यांच्याच अंगात एक खुमखूमी जागत असे आणि देहभान हरपूनसारेजण मोरयाचा उच्चार करत नाचत असत. तिथे मग सगळेचएकेमेकांचे मित्रअसत. तिथे वयाचे बंधन नसे. तरुणांच्या उत्साहाला आवर घालताना जेष्ठांच्या नाकी नऊ येत असत. काही छोट्यामोठ्या मारामारीचे प्रसंग देखील उद्भवतअसत. पण ते तेवढ्यापुरते असे. एकदा तिथूनमिरवणूक पुढे सरकली की मग एकदम नगरपरिषदेसमोर शेवटचाडाव होऊन बाप्पाला निरोपासाठी नदीवर नेले जात असे

 

कालानुरूप मिरवणुकीचे स्वरूप पालटले. हल्लीसुरक्षिततेचे कारण देऊन मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न असतो. तो निश्चितच स्तुत्य आहे. पण हे सगळे करत असताना विसर्जन मिरवणुकीची मजाच लोकांना घेत येणार नाही अशी पावलेउचलली जाणारनाहीत ही खबरदारी पोलिसआणि गणेश मंडळे घेतीलएवढी एक माफक अपेक्षा

 

 

टिपसदर छायाचित्र माझा मित्र अतुल काजळे (टिटू) याच्या ढोल ताशे अल्बममधून साभार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.