आयपीएलमध्ये १० सेकंदाच्या जाहिरातीसाठी किती खर्च येतो?

आयपीएल ही भारतातील सर्वाधिक यशस्वी लीग आहे हे सगळ्यांना माहीत आहेच. दरवर्षी बीसीसीआयला आयपीएलमधून हजारो कोटी रुपयांची कमाई होत असते. एवढ्या मोठ्या स्पर्धेतून फक्त बीसीसीआयच नाही तर ही स्पर्धा प्रक्षेपित करणाऱ्या चॅनेलचीही जोरदार कमाई होत असते. सध्या आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क स्टार इंडियाकडे आहेत. फक्त आयपीएल दरम्यान जाहिरातींमधून स्टार इंडिया किती कमाई करते याची आकडेवारी.

आयपीएल दरम्यान टीव्हीवर १० सेकंदाची जाहिरात दाखविण्यासाठी स्टार इंडियाकडून आकारण्यात येणारे दर
२०१९ – १२.५ लाख
२०२० – १२.६-१२.७ लाख (करोनामुळे दरात फारशी वाढ नाही)
२०२१ – १४ लाख

आयपीएल दरम्यान स्टार इंडियला जाहिरातींमधून मिळणारा महसूल
२०१९ – २१०० कोटी
२०२० – ३००० कोटी
२०२१ – ??

हॉटस्टारवर दिसणाऱ्या जाहिरातींसाठी जाहिरात करणारी कंपनी स्टारला आपल्या जाहिरातीच्या दर १००० इंप्रेशन्ससाठी पैसे देते. याला कॉस्ट पर थाऊजंड किंवा कॉस्ट पर मिली असं म्हणतात. १० सेकंदाच्या या जाहिरातीसाठी सिपीएम दर खालीलप्रमाणे
२०१९ – १००-११० रुपये
२०२० – १८० रुपये
२०२१ – २५०-३०० रुपये

हॉटस्टारला जाहिरातीतून मिळणारा महसूल
२०१९ – २५० कोटी
२०२० – ४०० कोटी
२०२१ – ??

यावर्षीच्या आयपीएलमध्ये खालील ब्रँडच्या जाहिराती दिसणार

विवो
ड्रीम११
अपस्टॉक्स
विमल इलायची
फोन पे
म्युच्युअल फंड सही है
अनअकॅडमी
फार्मइझी
लिव्हस्पेस
स्वीगी
पारले
कमला पसंद
बायजुज
जस्ट डायल

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.