टक्कलपूराण….

आज मी थोड्याशा विचित्र विषयावर लिहिणार आहे. टक्कल…का करतात लोक टक्कल? याला तशी बरीच कारणे आहेत.कोणी काही धार्मिक कारणासाठी, कोणी दुखवटा असतो म्हणून, काही लोक अगदी डोक्यात कोंडा झाला म्हणूनसुद्धा करतात.तर काही लोक उगाच काहीही कारण नसताना स्टाइल म्हणूनसुद्धा करतात.मी माझा समावेश शेवटच्या प्रकारात करतो.
गेली ४-५ वर्षे मी न चुकता वर्षातून किमान एकदा तरी टक्कल करतो.अगदी नाही जमलं तर किमान केस अतिशय बारिक करून टाकतो.का कोण जाणे पण मला हे असं आवडतं.सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ केली कि डोकं पुसायला वेळ कमी जातो.केस लहान असल्याने ते लवकर वाळून जातात.आणि याहून महत्वाचं म्हणजे केस विंचरावे लागत नाहीत.
अनेकदा मला लोक वेडा ठरवून मोकळे होतात.त्यांच्यामते हे असं टक्कल करणं फारसं सभ्यतेचं लक्षण नाही.पण मग ज्या लोकांना केसच नाहीयेत अशा लोकांचं काय? ते सगळे सभ्य नाहीत का?
बर टक्कल मी केलयं, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर माझ्याकडे बघू नका ना.केवळ तुम्ही लोक असं म्हणता म्हणून मी टक्कल करायचं नाही याला काही अर्थ नाही ना.
जसे काही लोक माझ्या या टक्कल करण्यावर आक्षेप घेतात त्याचप्रमाणे माझ्या या टक्कल करणे किंवा केस अगदी छोटे करणे याचं समर्थन करणारेसुद्धा बरेच लोक आहेत.आणि ते सगळेदेखील याच वर्गामध्ये मोडतात.यामध्ये माझे काही मित्र, काही मैत्रीणी, माझ्या बहीणी अगदी माझे वडील यांचादेखील समावेश होतो.
या टक्कल करण्याशी अनेक आठवणी जूळलेल्या आहेत.त्यातली एक इथे सांगतो.माझ्या एका मित्राने मला म्हटलं,” जर तू टक्कल केलसं तर मीदेखील करेल.” आता मला सवय आहे हो.मीसुद्धा त्याला हो म्हटलं.घरी गेलो आणि न्हाव्याकडे जाऊन टक्कल करून आलो. त्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की आता तूलादेखील टक्कल करावा लागेल.मला वाटलं हा कसलं करतोय टक्कल.पण नाही. ह्या मूलाचा मला एक तासाने पून्हा फोन आला आणि त्याने मला सांगितलं,”गुंड, मीसुद्धा टक्कल केलं बर का” मला खरतर पटलं नाही.पण त्याच दिवशी आम्ही एक नाटक पहायला गेलो होतो.माझा हा मित्र मला लांबून दिसला आणि त्याने खरोखर टक्कल केलं होतं.मी त्याला म्हटलं,” शाब्बास रे पठ्ठ्या.जिंकलास तू.” आणि पुढच्या १० मिनीटांत ह्याची आईदेखील तिथे आली. तिने त्याला आणि मला असं दोघाना इतकं झापलं की मला पण मी पून्हा टक्कल करेल की नाही यावर मला विचार करावा लागेल असं वाटून गेलं.
असे अनेक किस्से आहेत.पण हा मला जास्त आठवणीतला आहे म्हणून इथे सांगितला.तर असं हे टक्कलपूराण.आणि त्याबद्दलची माझी असलेली मते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.