समर कॅंप

मुंबईत उन्हाळ्यात हे चित्र रोजचं दिसतं. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून पालक मोठ्या हौसेने मुलांना कुठल्या न कुठल्या क्रिकेट कँपला टाकतात. अनेकदा यात ‘आपल्या वयात आपल्याला खेळायला मिळालं नाही, आपल्याला सोयीसुविधा मिळाल्या नाहीत.’ अशी अनेक बापांची खंत असते. आता मुलांना आपण सोयीसुविधा देऊ शकतो आहोत तर का नाही?असा विचारही यामागे असतो.बऱ्याचदा मुलांनाही क्रिकेटची आवड असते. अनेकदा पोरं उगाच बापाने टाकलंय नाव कँपला म्हणूनही जातात.कोचिंग घरापासून लांब असलं तरी लोकलने, बसने अगदी या फोटोत दिसतंय तसं वडिलांच्या गाडीवरही भर उन्हात ही मुलं क्रिकेट खेळायला जातात.कुठंतरी त्यांना आणि त्यांच्या बापाला आपलाही मुलगा उद्याचा पृथ्वी शॉ होईल अशी भाबडी आशा असते. या मुलांच्या आणि पालकांच्या आशेचंच भांडवल करून हे उन्हाळी कँप सुरू असतात.त्यातून पृथ्वी, विराट, रोहित एखादाच होतो.काहीजण तरीही तग धरून लोकल क्लब क्रिकेटमध्ये नशीब आजमावत राहतात.बहुसंख्यजण धोपटमार्ग पकडून ९:१९ ची लोकल पकडू लागलेले असतात.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.