श्रद्धा..

“ये किसका बॅग है?” एअरपोर्ट सिक्युरिटीला ड्युटीवर असलेल्या सीआयएसएफच्या माणसाने बेल्टवर स्कॅन होऊन आलेली एक बॅग हातात घेत विचारले.

“हमरा है जी.” माझ्यासमोर उभ्या असलेल्या पन्नाशीतल्या एका बाईने आपली बॅग ओळखत उत्तर दिले.

“खोलो इसे. चेक करना पड़ेगा.”

“क्या हुआ?” तिला बिचारीला कळेना नक्की काय झाले.

“खोलो तो पहले.” त्याने पुन्हा फर्मावले.

तिने बॅगची चेन उघडली. त्याने वरुन  ढुंकून पहात काहीतरी शोधायचा प्रयत्न केला. ते बहुधा त्याला दिसले नसावे.

“इसमें लोहेका तुकडा है एक. ऐसे शेपका.” हाताने इंग्रजी यु आकार हवेत काढत त्याने तिला सांगितले.

“हां हैं.” तिने उत्तर दिले.

“उसे बाहर निकालो.” बॅग तिच्याकडे सरकवत त्याने आदेश दिला.

तिने बॅगेत हात टाकून तो तुकडा बाहेर काढला. तो तुकडा म्हणजे घोड्याची नाल होती.

“यह अलाउड नही है ले जाना.”

“काहे?” तिने भाबडेपणाने विचारले.

“अरे अलाउड नही बोले ना हम.”

“बताओ अब क्या करे? इतने दूरसे लेकर आये थे हम.इससे भला हम क्या करेंगे? जाने दीजिये. बिनती करते है हम.”

“अरे लेकिन यह लेकर नही जा सकते.” त्याने पुन्हा सांगितले.

“हम कहाँ किसको मारनेवाले है.मंदिर गए थे नेपाल. वहासे लाये है बड़ी श्रद्धा से.महंगा भी है. ३०० में खरीदा था.और आप कह रहे यही रखो. भला ऐसे कैसे रखे?”

“साबसे बात करनी पड़ेगी.” त्याने साहेबांकडे डोळे दाखवत सांगितले.

“अरे काहे साहब के पास भेज रहे हो.जाने दो.बिनती करते है.इससे भला हम क्या भी कर सकते है.भगवान की चीज है.श्रद्धा है हमारी बस और कुछ नही.”

ही बाई घोड्याची नाल घेऊन तर आलीये.चेहऱ्यावरून साधी वाटतेय फारच. नाल तशीही देव्हाऱ्यात ठेवणार आहे. काय हरकत आहे असा विचार करत त्याने ती तिच्या उघड्या बॅगेत भिरकावली आणि म्हणाला,

“जाइये.श्रद्धा हमारी भी है बस यह नौकरी कभी कभी बीचमें आती है.”

“बहुत धन्यवाद आपका.” म्हणत तिने खुशीने बॅगची चेन लावली आणि आपल्या गेटकडे निघून गेली.

मी बाजूला उभा राहून गालात हसत आहे पाहून तो मला म्हणाला,

“क्या भी करे सर.सबको खुश रखना पड़ता है.बात आखिर श्रद्धा की है.”

“जी बिलकुल.” म्हणत मीही माझ्या गेटकडे चालू लागलो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.