रणजी करंडक २०१९-२०

आजपासून सुरू होणारा रणजी हंगाम आजवरचा सर्वाधिक मोठा

९ डिसेंबर २०१९ ते १३ मार्च २०२०

एकूण संघ – ३८

यावर्षी प्रथमच सहभागी होत असलेला संघ – चंदीगड

संघांची विभागणी अ,ब, क आणि प्लेट अशा चार गटांत

अ,ब गटांत प्रत्येकी नऊ संघ तर क आणि प्लेट गटांत प्रत्येकी दहा संघ

अ, ब गटांमधून (अ आणि ब गट मिळून) सर्वाधिक गुण मिळवणारे पाच संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार

क गटातून दोन तर प्लेट गटातून एक संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार

रणजीच्या गेल्या दोन हंगामात विदर्भाने विजेतेपद मिळवले आहे. यावर्षी विजेतेपद मिळवून हॅट्ट्रिक केल्यास अशी कामगिरी करणारा मुंबईनंतरचा हा दुसराच संघ असेल.

भारताच्या संघातुन सध्या बाहेर असलेले आर अश्विन, दिनेश कार्तिक, मुरली विजय, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ हे खेळाडू रणजीत खेळणार

इशांत शर्मा आणि उमेश यादव यांना पहिली फेरी न खेळण्याच्या बीसीसीआयकडून सूचना

गुजरातकडून बुमराह तर बडोद्याकडून हार्दिक पंड्या पुनरागमन करत आपली तंदुरुस्ती सिद्ध करू शकतात.

यावर्षीच्या रणजी हंगामात होऊ शकतात हे विक्रम

१. वसीम जाफर – प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०००० धावा पूर्ण करण्यासाठी वसीम जाफरला ८५३ धावांची गरज. गेल्या हंगामात विदर्भाकडून खेळताना त्याने १०३७ धावा काढल्या होत्या.

रणजी करंडकात २०० झेल घेणारा पहिला खेळाडू बनण्यासाठी जाफरला केवळ तीन झेलांची गरज.

या हंगामातला पहिला सामना हा जाफरचा दिडशेवा रणजी सामना असेल. अशी कामगिरी करणारा जाफर पहिलाच खेळाडू.

२. चेतेश्वर पुजारा – प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५० शतके पूर्ण करण्यासाठी पुजाराला केवळ एका शतकाची गरज. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय खेळाडू ठरेल.

३. विनय कुमार – पूर्वी कर्नाटककडून खेळलेला आणि यावर्षी पॉंडीचेरीकडून खेळत असलेल्या विनय कुमारला रणजी करंडकात ४०० बळी पूर्ण करण्यासाठी केवळ ३ बळींची गरज. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा जलदगती गोलंदाज ठरेल. पहिला पंकज सिंग (४०९ बळी)

४. बिहार – बिहारने गेल्या हंगामाची सांगता सलग सहा सामने जिंकून केली होती. अजून दोन सामने जिंकून ते मुंबईच्या सलग आठ सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतात.

५. नमन ओझा – रणजी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक असलेल्या नमनला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०००० धावा पूर्ण करण्यासाठी ४४० धावांची गरज.

६. पार्थिव पटेल – यष्टीरक्षक म्हणून ३०० बळी पूर्ण करण्यासाठी पार्थिवला १७ बळींची गरज. अशी कामगिरी करणारा तो पाचवा यष्टीरक्षक ठरणार.

७. अमित मिश्रा – रणजीमध्ये ३०० बळी पूर्ण करण्यासाठी अमितला केवळ तीन बळींची गरज

८. १०० रणजी सामने –

दिनेश कार्तिक – ३ सामन्यांची गरज

अभिनव मुकुंद – ४ सामन्यांची गरज

पार्थिव पटेल – ५ सामन्यांची गरज

आकडेवारी साभार इएसपीएन क्रीकइन्फो

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.