भारतातील क्रेडिट कार्ड मार्केट

A look at credit card market in India

आपल्याला दिवसातून एकदा तरी क्रेडिट कार्ड हवे आहे का? अशी विचारणा करणारा फोन येत असतो. या अशा टेलिमार्केटिंग मधून अनेकांना क्रेडिट कार्ड मिळतेसुद्धा. मात्र भारतात एकूण क्रेडिट कार्ड्सची संख्या किती? या सेक्टरमध्ये लिडिंग प्लेयर कोण? याचा मागोवा या लेखातून घेऊ.

फेब्रुवारी २०२१ अखेरीस भारतातील क्रेडिट कार्ड्सची एकूण संख्या – ६.१६ कोटी

हीच संख्या ऑगस्ट २०२० मध्ये ५.७८ कोटी तर डिसेंबर २०२० मध्ये ६.०४ कोटी एवढी होती.

भारतातील क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये सर्वाधिक शेअर कुणाचा?

फेब्रुवारी २०२१ अखेरीस  एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हिजनने १.५१ कोटी क्रेडिट कार्ड इश्यू केली आहेत.

त्याखालोखाल एसबीआय कार्ड्सने १.१७ कोटी, आयसीआयसीआय बँक १.०३ कोटी, एक्सिस बँक ७० लाख, आरबीएल बँक २८.९ लाख, कोटक महिंद्रा बँक २३.७ लाख, इंडसइंड बँक १५ लाख आणि आयडीएफसी फर्स्ट बँक १.७३ लाख यांचा नंबर लागतो.

फेब्रुवारी २०२१ अखेरीस परदेशी बँकांनी इश्यू केलेल्या क्रेडिट कार्ड्सची संख्या

सिटी बँक – २६.४५ लाख
अमेरिकन एक्सप्रेस – १५.५९ लाख
स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक – १४.६३ लाख

हा मार्केट शेअर टक्केवारीत सांगायचा झाला तर
एचडीएफसी बँक – २४.७%  एसबीआय कार्ड्स – १९%
आयसीआयसीआय बँक – १६.८%
ऍक्सिस बँक – ११.४%
आरबीएल बँक – ४.७%
कोटक महिंद्रा बँक – ३.९%

आंतरराष्ट्रीय बँकांचा मार्केट शेअर टक्केवारीत सांगायचा तर
सिटी बँक – ४.३%
अमेरिकन एक्सप्रेस – २.५%
स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक – २.४%

फेब्रुवारी २०२० मध्ये भारतात एकूण १०.३७ लाख नवी क्रेडिट कार्ड्स इश्यू केली गेली होती. करोनामुळे हाच आकडा फेब्रुवारी २०२१ मध्ये ५.४९ लाखापर्यंत खाली आला आहे.

आता ही नवी क्रेडिट कार्ड्स इश्यू करण्यामध्ये कोण आघाडीवर आहे? (फक्त फेब्रुवारी २०२१ या महिन्यासाठी)

आयसीआयसीआय बॅंक – १,९८, ५३१ – ३६.१% मार्केट शेअर
एसबीआय कार्ड्स – ९९६३० – १८.१% मार्केट शेअर
एचडीएफसी – १०.४% (रिझर्व्ह बँकेने एचडीएफसीच्या नवी क्रेडिट देण्यावर बंधने घातली आहेत. त्यामुळे त्यांचा मार्केट शेअर कमी झाला.)
ऍक्सिस बँक – ९८७८३ – १८% मार्केट शेअर

भारतातील क्रेडिट कार्ड सेक्टरमध्ये एसबीआय कार्ड्स ही एकमेव कंपनी लिस्टेड आहे. इतर कोणतीही कंपनी लिस्टेड नसल्याचा फायदा या स्टॉक ला होऊ शकतो. मात्र भविष्यात इतर कंपन्यांचे आयपीओ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.