गेले ७९४ आठवडे जोकर, रॉजर, राफा आणि मरे यांच्यापैकी कुणीतरी दोघे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असायचे. एवढ्या दीर्घ काळानंतर प्रथमच या चौघांपैकी फक्त एक जण (जोकर) पहिल्या दोघांत आहे.
या चौघांपैकी एकच जण टॉप २ मध्ये अशी वेळ याआधी १८ जुलै २००५ मध्ये आली होती. त्यावेळेस ऑस्ट्रेलियाचा लेटन ह्युईट दुसऱ्या स्थानी होता. त्यावेळच्या टॉप १० मधून फक्त रॉजर आणि राफा सध्या टेनिस खेळत आहेत.
मेदवेदेव आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आला आहे.
त्याचा प्रवास काहीसा असा आहे.
जानेवारी २०१६ – ३२९
जानेवारी २०१७ – ६३
नोव्हेंबर २०१८ – १६
जुलै २०१९ – १०
ऑगस्ट २०१९ – ५
फेब्रुवारी २०२१ – २
मेदवेदवच्या आधी रशियाच्या निकोलाय डेव्हीडेंकोने २००५ मध्ये एटीपी क्रमवारीत टॉप ५ मध्ये स्थान मिळवले होते.गेल्या वर्षीच्या नीट्टो एटीपी फायनल्स मध्ये त्याने जोकर, राफा आणि थीम या टॉप ३ खेळाडूंना हरवत विजेतेपद जिंकले होते.