प्राज इंडस्ट्रीज – उद्याचा मल्टीबॅगर?

सध्या सरकारचा इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यावर जास्त भर दिसतोय. इथेनॉलचा इंधन म्हणून उपयोग आत्ताही केला जातो आहे. भविष्यात हा उपयोग वाढीस लागावा आणि एक पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
Image – Twitter/Ministry Of Petroleum And Natural Gas
इथेनॉलचे उत्पादन वाढत असताना त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीची गरजही वाढत जाणार आहे. ही यंत्रसामुग्री बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये पुण्यातील प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी आघाडीवर आहे.  इथेनॉल उत्पादनात गेल्या वर्षात होणारी वाढ या कंपनीच्या पथ्यावर पडली आहे. कंपनीचे बाजारमूल्य ३३५५ कोटी एवढे आहे.
वॉरन बफे यांची १ डॉलर चाचणी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कंपनीच्या भागधारकांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ही चाचणी म्हणजे काय ते विषद केले होते. ही चाचणी कंपनीने कमावलेल्या प्रत्येक १ डॉलर कमाईतून त्यांनी भागधारकांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य किती पटीने वाढवले हे सांगते. प्राजच्या बाबतीत १ डॉलर चाचणीचा निकाल पाहिला तर गेल्या पाच वर्षांत दर १ रुपया कमाईमागे या कंपनीने भागधारकांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य १५.४ रुपये एवढे केले आहे.
Image – MoneyControl.com
कंपनीच्या एकूण महसुलापैकी  ७०% देशांतर्गत बाजारपेठेतून तर ३०% परदेशातून निर्माण होतो. केंद्र सरकारच्या इथेनॉल ब्लेंडिंग धोरणामुळे कंपनीच्या बायो एनर्जी विभागाला म्हणजेच इथेनॉल निर्मितीसाठीची सामग्री बनविणाऱ्या विभागाला चालना मिळाली आहे.
Image – MoneyControl.com
भारतात सध्या इथेनॉल ब्लेंडिंगचे प्रमाण ६% एवढे आहे. गेल्या २-३ वर्षांपूर्वी हेच प्रमाण २-३% एवढे होते. सरकारने २०२५ वर्षाअखेरीस हेच प्रमाण २०% पर्यंत वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे. अगोदर हे ध्येय २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र आता अनुदान,विविध योजना यांच्यामार्फत सरकारने हेच ध्येय पाच वर्षे आधीच साध्य करण्याचे ठरवले आहे.

 

या ध्येयापैकी  ६०-७०% टक्के ध्येयाची पूर्तता करायची म्हटलं तरी किमान १० ते १५,००० कोटींच्या निधीची गरज पडणार. या क्षेत्रात प्राज गेली अनेक वर्षे काम करत असल्याचा अनुभव तसेच या क्षेत्रात अग्रस्थानी असल्याचा परिणाम त्यांच्या ऑर्डरबुक वर होताना दिसतोय. डिसेंबर २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला ६०५ कोटींच्या नव्या ऑर्डर मिळाल्या. यामुळे कंपनीच्या एकूण ऑर्डर्सची किंमत १६६५ कोटींवर जाऊन पोहोचली आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात कंपनी योग्य प्रमाणात महसूल निर्मिती करेल यात शंका नाही.
Image – MoneyControl.com
कंपनीच्या इंजिनियरिंग डिव्हिजनला डिसेंबर २०२० च्या तिमाहीत  इंडियन ऑइलकडून २०० कोटींची ऑर्डर मिळाली आहे. डिसेंबर २०२० च्या तिमाहीत इंजिनियर डिव्हिजनच्या महसुलात ४९% घसरण झाली तर बायो एनर्जी डिव्हिजनच्या महसुलात तब्बल ५५% ची वाढ झाली.
Image – MoneyControl.com
कंपनीच्या हातात असलेल्या ऑर्डर्सकडे पाहता इंजिनिअरिंग डिव्हिजनच्या व्यवसायात लवकरच वाढ दिसू शकते. या आर्थिक वर्षात कंपनीच्या महसुलाचे आकडे गेल्यावर्षीएवढेच असू शकतात. मात्र २०२२ आर्थिक वर्षांपासून महसुल आणि नफ्यात वाढ होताना दिसू शकते.

 

कंपनीचा कालचा बाजारभाव १८१.७० रुपये एवढा आहे. १ डिसेंबर २०२० पासून हा शेअर जवळपास दुप्पटीने वाढला आहे. केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मिती धोरण, पेट्रोल डिझेलसाठी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलची वाढत चाललेली लोकप्रियता, या क्षेत्रात कंपनीचे असलेले अग्रस्थान पाहता येणाऱ्या काही वर्षांत हा शेअर चांगला परतावा मिळवून देऊ शकतो.

 

टीप – प्राज इंडस्ट्रीज बाबत मनीकंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा स्वैर मराठी अनुवाद. हा लेख म्हणजे गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आपापल्या सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.