विजय हजारे ट्रॉफी २०२१: यंदा अनेक नव्या विक्रमांचा नांदी, वाचा खास आकडेवारी

रविवारी (१४ मार्च) मुंबई संघाने विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशचा पराभव करत विजेतेपद जिंकले. मुंबईने ६ विकेट्सने हा सामना जिंकत चौथ्यांचा विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. या सामन्यासह या हंगामातील विजय हजारे ट्रॉफीची सांगता झाली आहे.

हा हंगाम अनेक अर्थांनी आगळा वेगळा ठरला आहे. या हंगामात पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कलसह अनेक युवा खेळाडू चमकले. तसेच अनेक नव्या विक्रमांचीही या हंगामामुळे भर पडली आहे. याचाच या लेखातून आढावा घेऊ.

मुंबईने पटकावले विजेतेपद

रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३१२ धावा करत मुंबईला ३१३ धावांचे आव्हान दिले होते. उत्तर प्रदेशकडून माधव कौशिकने नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. तसेच समर्थ सिगं आणि अक्षदिप नाथ यांनी प्रत्येकी ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईकडून तनुष कोटीयनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून आदित्य तरेने नाबाद ११८ धावांची शतकी खेळी केली. तसेच कर्णदार पृथ्वी शॉने ७३ धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने ४२ आणि शम्स मुलानीने ३६ धावांची छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे मुंबईने ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३१३ धावांचे आव्हान ४१.३ षटकात सहज पार केले आणि सामना जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले.

या वर्षीची विजय हजारे ट्रॉफी अनेक नव्या विक्रमांमुळे लक्षात राहील.

या वर्षी झालेले विक्रम

१. या वर्षी एकूण ४४ वेळा संघांनी ३०० हुन अधिक धावा केल्या.

२. एकूण शतके – ८७

३. सर्वाधिक धावसंख्या – मुंबई ४५७/४ वि पुद्दुचेरी

४. विजय हजारे ट्रॉफीच्या एका हंगामात सर्वाधिक धावा – पृथ्वी शॉ – ८२७

५. सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या – पृथ्वी शॉ – नाबाद २२७ विरुद्ध पुद्दुचेरी

६. अ श्रेणी सामन्यात लागोपाठ चार शतके करणारा पहिला भारतीय फलंदाज – देवदत्त पड्डीकल

७. एका डावात यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक झेल – ७ – इशान किशन वि मध्य प्रदेश

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.