एनबीए फायनल्सच्या आज झालेल्या सामन्यात टोरंटो रॅप्टर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सचा १०५-९२ असा पराभव करत सात सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली.एनबीएच्या इतिहासात १-३ अशा पिछाडीवर असताना आजवर फक्त एकदा पिछाडीवरील संघाने मालिका जिंकली आहे. लेब्रॉन जेम्स, कायरी आयर्विंग आणि केविन लव्ह यांच्या खेळाच्या जोरावर २०१६ च्या अंतिम फेरीत क्लिव्हलँड कॅव्हेलीयर्सने गोल्डन स्टेट वॉरियर्सचा १-३ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत ४-३ असा पराभव केला होता. कॅव्हेलीयर्सचे हे पहिलेच विजेतेपद होते. एनबीए फायनल्समध्ये १-३ अशा पिछाडीवर असणाऱ्या संघाने विजय मिळवण्याचे रेकॉर्ड १-३३ म्हणजे एक संघ फक्त जिंकू शकला आहे आणि ३३ वेळा पिछाडीवरील संघ हरला आहे.
रॅप्टर्सचा स्टार खेळाडू क्वाही लेनर्ड याने गोल्डन स्टेटच्या संघाला अक्षरशः आपल्या तालावर नाचवले. रॅप्टर्सच्या ३-१ अशा आघाडीनंतर ब्लिचर रिपोर्टने प्रसिद्ध केलेले सोबतचे छायाचित्र खूपच बोलके आहे.
https://www.instagram.com/p/Bybxclqp_ON/
यावर्षीच्या अंतिम फेरीत गोल्डन स्टेट वॉरियर्सने जर जिंकण्याची किमया साधली तर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा संघ असेल. मालिकेतील पाचवा सामना टोरंटो रॅप्टर्सच्या घरच्या कोर्टवर मंगळवारी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६:३० वाजता सोनी सिक्स वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल.
बाकी या अंतिम फेरी बद्दल सविस्तर लवकरच..