आहे अजुनि मी..

नमस्कार..आज पुन्हा एकदा मोठ्या विश्रांतीनंतर काहीतरी लिहीत आहे.
परवाकडे एक बातमी वाचली. अमितभने त्याच्या ब्लॉगवर १००० वा ब्लॉग लिहीला.आणि पुढे मग अमिताभ ब्लॉग लिहीताना किती नियमीतपणे ब्लॉग लिहीतो. इतर लोक किंवा सेलिब्रिटीज कसे फक्त सुरुवात करतात आणि मग जसे दिवस जातील तसे कसे ते अनियमीत होत जातात याबद्दल काही चर्चा. ही बातमी वाचून माझ्या मनात आलं मीदेखील गेले काही दिवस ब्लॉग लिहीत आहे. आणि नकळतपणॆ मग मी विचार केला की आपण असे कितपत नियमीत आहोत? आणि उत्तर आलं फारसा नाही.
आणि मग मी विचार केला आपण ब्लॉग नियमीतणे न लिहीण्यामागे काय कारण असेल किंवा असू शकेल.तर कारणं बरीच सुचली.त्यापैकी काही अशी
१. मी फार बिझी असतो. अभ्यासातून वेळ मिळत नाही.
२. ब्लॉग लिहीण्यासाठी मनात काहीतरी आलं पाहिजे.
३. एखादा विषय सुचलाच तर त्यावर पुरेसं लिहू शकू का?
४. मला माझा ब्लॉग अपडेट करण्याशिवाय अजुनही पुष्कळ कामे आहेत.
५. मी करत असलेला कंटाळा.
ही कारणं पाहून माझं मलाच वाटलं आपण उगाच ही कारणं शोधून काढतो आणि कंटाळा करत राहतो. नकळत मग बच्चनजींबरोबर तुलना केली गेली. तो ६० वर्षाहून जास्त वय असलेला माणूस जर नियमीतपणॆ लिहीत असेल तर आपण का नाही.काम तर त्यालासुद्धा आहे. मग आपण हे का करू शकत नाही. मला माझ्या काही मित्रांनी शिव्यादेखील दिल्या, “गुंड्या मेलास की काय? काहीच लिहीलं नाहियेस इतक्यात.” आणि मग विचार केला आपण खरचं आपण नियमीतणे लिहुयात.इथून पुढे जमेल तितकं नियमीत लिहीण्याचा प्रयत्न करेल.तोपर्यंत राम राम.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.