अजिंक्य रहाणे

त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच नाव ‘जिंक्स’ ठेवलं. तो मात्र भारतीय संघासाठी अनेकदा गुडलकच ठरलाय.द्रविडला आदर्श मानणाऱ्या त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना देखील द्रविड बरोबरच खेळला.हा सामना द्रविडच्या २१ चेंडूतील ३१ धावांच्या खेळीमुळे सगळ्यांना लक्षात आहे.याच सामन्यात त्याने ३९ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या.

देशाबाहेर भारतीय फलंदाज अपयशी ठरतात हा समज खोडून काढण्यात काही प्रमाणात त्याचाही वाटा आहे.

एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल, लॉर्डसवर शतक,आयपीएल मध्ये एकाच षटकांत सहा चौकार, रणजीच्या एकाच हंगामात एक हजाराहून अधिक धावा असे अनेकानेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करत त्याने आपले सामाजिक भानही दाखवून दिले.

भारतीय संघाचा अविभाज्य घटक बनलेल्या त्याला गेल्या एक दीड वर्षांत आपली जागा टिकवायला संघर्ष करावा लागला. इंग्लंडमध्ये चांगले रेकॉर्ड असूनही त्याला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही.मात्र यातूनही सावरून तो कमबॅक करेल याची खात्री वाटते. चाहत्यांच्या लाडक्या अज्जूला म्हणजे अजिंक्य रहाणेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.